दूध भेसळ करणाऱ्यांवर मकोका लावावा आमदार अभिजीत पाटील यांनी सभागृहात उठवला आवाज

0

उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

          माढा (प्रतिनिधी) -  माढा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार अभिजीत पाटील यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने विधानभवन सभागृहामध्ये पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील दुध भेसळ प्रकरण सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले असता त्यावर आमदार अभिजीत पाटील यांनी आवाज उठवला. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने बैठक घेण्यात आली.

             दूध आणि तस्सम अन्नपदार्थातील भेसळ मानवी आरोग्याला घातक आहे त्यामुळे अशी भेसळ करणारा मकोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी सध्याच्या कायद्यात आवश्यकता सुधारणा करण्यात येतील त्यासंबंधीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी बैठकीत दिले.

          राज्यामध्ये भेसळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे ॲनालॉग चीज हा पदार्थ अनेक ठिकाणी ॲनालॉग पनीर या नावाने विक्री होत असल्याची तक्रार आहेत. पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील दुध भेसळ प्रकरण उघडकिस आले त्या अनुषंगाने आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, राज्यमंत्री योगेश कदम, आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार अभिजीत पाटील, आमदार कैलास पाटील, आमदार विक्रम पाचपुते व वरिष्ठ अधिकारी सह सोलापूर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक हेही उपस्थित होते.
---------------------------------------------------
        माझ्या मतदारसंघातील भोसे येथील दुध भेसळ करणाऱ्यांवर मकोका कारवाई करावी. लोकांच्या आरोग्याशी जीवाशी खेळणाऱ्यांवर कारवाई व्हावी म्हणून मी अधिवेशनात आवाज उठवला त्यास उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री नरहरी झीरवळ यांनी तातडीने त्यावर बैठक लावून कारवाई करण्याचे आदेश केले आहेत. परंतु राज्यामध्ये सर्वत्र दूध भेसळ प्रकरण मोठ्या प्रमाणात चालत आहेत त्यावर देखील कारवाईची मागणी केली आहे.
                - आमदार अभिजीत पाटील
---------------------------------------------------

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)